कंगनाला केंद्राची ‘वाय’ श्रेणीतील सुरक्षा

Foto
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेश सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने तिला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
मुंबईविषयी वक्तव्य करणार्‍या कंगनावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळेच त्यांना प्रत्युत्तर देत कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबई येणार असल्याचे ठरवले आहे. मात्र, तिच्या वक्तव्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. त्यामुळे तिच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळले. विशेष म्हणजे या परिस्थितीमध्ये हिमाचल प्रदेश सरकारनेदेखील कंगनाला सुरक्षा दिली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने सुरक्षा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker